भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगच्यावतीने विद्यार्थ्यांची रॅली
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगच्यावतीने महिलांविरूद्ध अंतर्गत तक्रार समितीच्या (महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक) वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांच्या प्रमुख उपस्थितीने रॅलीची सुरूवात झाली. यावेळी नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे व सर्व सहकारी उपस्थित होते.
स्टॉप वायोलेन्स अगेन्स वूमन, नारी ही शक्ती है, एक नारी सब पे भारी अशा घोषणा विद्यार्थी देत होते. भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेज ते विजयनगरपर्यंत ही रॅली निघाली. यात सुमारे २०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. वेगवेगळ्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण थांबविण्यासाठी, त्याची समाजात जाणीवजागृती निर्माण व्हावी हा उद्देश या रॅलीचा होता.
यावेळी डॉ.अपर्णा काळे, शिल्पा सत्राळकर, डॉ.बाहुबली गेदुगोळ, मिल्खा देवराज, आशा नायकवडी, विशाल घोरपडे, आक्कमादेवी बेरगिरी, सचिन सकटे, निखिल जाधव उपस्थित होते.