भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयातर्फे दंतोपचार शिबीर
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयातर्फे दंतोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी दिली. २८ ऑगस्ट रोजी हनुमान मंदिर अंबक आणि २ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सोनसळ येथे कॅम्प होणार आहे. यामध्ये दात साफ करणे, दात काढणे, दातांमध्ये सिमेंट भरणे, टॉपिकल फ्लोराईड, पिट अँड फिशर सिलंट हे दातांचे उपचार मोफत केले जाणार आहेत.
एकाच छताखाली सर्व उपचार होणार आहेत. यामध्ये डेंटल कॅम्प बस आहे. अत्याधुनिक बस असल्याने यातच सर्व उपचार होतात. तरी रुग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन दंतचे प्राचार्य डॉ.शरद कामत यांनी केले आहे. कॅम्पमध्ये आलेला एखादा रुग्ण परत भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात आला तर त्याला काही उपचारांवर २५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
दंतचे कार्यालय अधीक्षक हणमंत यादव, पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री विभाग प्रमुख डॉ.श्रीवर्धन कलघटगी, सतीश भोळे यांचे सहकार्य लाभले.
यापूर्वी ग्रामपंचायत हिंगणगाव, बेलवडे, विठ्ठल मंदिर मानमोडी येथे कॅम्प झाले आहेत.