भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंग प्रतिबंधकविषयी चर्चासत्र
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय कॉलेज ऑफ नर्सिंग येथे रॅगिंग प्रतिबंध समिती यांनी रॅगिंग प्रतिबंधक उपाययोजना याविषयी चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रविण कांचन व ॲड. प्रशांत जरांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या डॉ.निलिमा भोरे यांनी चर्चासत्र आयोजित केले होते.
पीएसआय प्रविण कांचन म्हणाले, तुम्ही सर्व मुले आता १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहात. अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करा. या वयात कुठलाही गुन्हा दाखल होऊन देऊ नका. कुठेही रॅगिंग सहन करू नका. एखादी गोष्ट आवडत नसल्यास लगेच मित्राला सांगा. मी तुमच्या कुठल्याही मदतीला तयार आहे. घाबरू नका असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे प्रा.प्रशांत जरांडीकर यांनी रॅगिंग म्हणजे काय, केले तर काय शिक्षा होते. यापूर्वी घडलेल्या पाच केसबद्दल सांगितले. चर्चासत्रासाठी प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, डॉ.बसवंत दुडूम, स्नेहलता रेड्डी, योगेश भोसले, रोहित रोकडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत डॉ.बसवंत दुडूम यांनी केले. आभार स्नेहलता रेड्डी यांनी मानले.