BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक दृष्टीदान दिवस साजरा


भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक दृष्टीदान दिवस साजरा 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जागतिक दृष्टिदान दिवस साजरा करण्यात आला. प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.भालचंद्र यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे,  उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा गायकवाड, अभिजीत तोडकर, श्वेता कुलकर्णी उपस्थित होते.

अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज म्हणाले, डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. जास्तीत जास्त लोकांनी दृष्टिदानाचा संकल्प केला पाहिजे. ही दृष्टिदानाची चळवळ गतिमान करण्यासाठी आपणा सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सर्वांनी डोळ्यांची काळजी घेण्यास सांगितले.

 डॉ. अजित जोशी म्हणाले, सध्याच्या काळात डिजिटल आयस्ट्रेन्थसारखे नवीन चॅलेंज वाढत आहे. प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. भालचंद्र यांच्या काळात या सुविधा नव्हत्या. वेळच्यावेळी दृष्टी तपासून अंधत्व दूर ठेवले पाहिजे.


 नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. राजेश गोटेकर यांनी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्यास सांगितले. वेळच्या वेळी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. नेत्र तपासणी जरी केली तरी दृष्टिदान केल्यासारखेच आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.डॉ.सारा धनवडे यांनीही माहिती दिली.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, ऑप्टोमेट्री कॉलेजचे विद्यार्थी, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. विराज पाटील आणि आभार डॉ. शलाका क्षीरसागर यांनी मानले.