भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदाता दिवस साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला. ब्लड बँकेतर्फे याचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून तरूणांनी रक्तदान केले.
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.नितीन मुदीराज, नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे प्रमुख उपस्थित होते.
डॉ.मुदीराज म्हणाले, ब्लड बँका या रक्तदात्यांवर चालत असतात. रक्त दिले तरच काही लोकांचे जीव वाचतात. कोणी रक्तदान केले तरच कुणालातरी रक्त मिळत असते. रक्तदात्यांना धन्यवाद म्हणण्याचा आजचा हा दिवस आहे. रक्तदान करण्याचे शिबीर सातत्याने आयोजित करत जावा. मी सहकार्य करतो.ब्लड बँकेच्या प्रमुख डॉ .यशोधरा गोटेकर म्हणाल्या, ब्लड बँकेत आम्ही जेरक्त गोळा करतो त्यातून तांबड्या पेशी, प्लाझमा, प्लेटलेट्स या घटकाचे संकलन केले जाते. ते बाहेरही आम्ही देतो. भारती हॉस्पिटलमध्ये भरपूर
सुविधा आहेत. पण रक्तदाता असल्याशिवाय आपण ते करू शकत नाही. त्यांना प्रोत्साहित करण्याचा आजचा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदान चळवळीत सक्रिय सहभागी झाल्याबद्दल रक्तदाते चिंतामणी पवार, पियुष सरवदे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुरेशकुमार रे यांनी रक्तदान केले.
यावेळी उपाधिष्ठाता डॉ.अजित जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड, वरदा सावर्डेकर, डॉ.वैभव माने, अभिजीत तोडकर, श्वेता कुलकर्णी, धनंजय भिसे यांच्यासह स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.