भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात सायबर जनजागृती अभियान
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात सायबर क्राईम आणि डिजीटल सिक्युरिटीविषयी सेमिनार आयोजित केले होते. सांगली सायबर पोलीस ठाणेतर्फे सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आले. स्वागत प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी केले.
कॉलेजमधील अँटीरॅगिंग कमिटी, एनएसएस युनिट यांनी आयोजन केले होते. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस करण परदेशी, इम्रान महालकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, ईमेल, एसएमएसमध्ये आलेल्या अनोळखी लिंक्स ओपन करू नका, .Apk फाईल डाऊनलोड करू नका. ऑनलाइन पैशांचे व्यवहार करताना सतर्कता बाळगा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचे फ्रॉड कसे होतात ते ही सांगितले. विद्यार्थी असतील किंवा तरूण सेक्सॉटर्शनच्या जाळ्यात अजिबात अडकू नका असे आवाहनही केले.
प्रा. बसवंत धुडम, प्रा. नारायण घोरपडे, प्रा. बाहुबली गेद्दुगोळ, प्रा. स्नेहलता रेड्डी, प्रा. तेजस्विनी चौगुले, प्रा. योगेश भोसले यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.प्रा. रोहित कांबळे यांनी आभार मानले.