BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयातील खेळाडूंचे यश

 


भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयातील खेळाडूंचे यश 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी सुयश जगताप याने राज्यस्तरीय लांब उडीत गोल्ड मेडल प्राप्त केले. त्याचे अभिनंदन प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी केले. SNAI MAHACON - 2025 ही ३१ वी SNAI बिनाईल परिषद लातूर येथे संपन्न झाली. सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा TNAI इंडिया महाराष्ट्र शाखा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती.

४×४०० मी. रिले स्पर्धेत सुयश जगताप, महमद हुसेन राटविलकर, आर्यन मोरे, महमद अत्तार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रमुख प्रा. शार्दुल जाधव व प्रा. अक्कमा बेरीगिरी यांचे मार्गदर्शन लाभले.

 सुयश जगताप याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.