BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये डिबेट स्पर्धा संपन्न


भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये डिबेट स्पर्धा संपन्न 

सांगली / रोहित रोकडे 

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये डिबेट स्पर्धा २०२३ संपन्न झाली. डीन डॉ.सारा धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीममध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. 

एका टीममध्ये तीन व दुसऱ्या टीममध्ये तीन जणांचा समावेश होता. 'नेक्स्ट बुन विरुद्ध बेन' हा डिबेटचा विषय होता. त्यामध्ये टीम -ए मध्ये इंटर्न विद्यार्थी डॉ. नताशा श्रीवास्तव, विनुथ व्ही.एच., जाहिद पालेघर यांना 'टीम फॉर नेक्स्ट ' तर टीम बी यातील इंटर्न डॉ. आदर्श शुक्ला, शिवलींग स्वामी, कृतार्थ तिवारी यांची 'टीम अगेन्सट नेक्स्ट' अशी होती.  याचे परीक्षक म्हणून बालरोग तज्ज्ञ व विभागप्रमुख डॉ.सुहास कुंभार, डेप्युटी डीन डॉ.आर.पी.लिमये, प्रा.गजानन बेलवलकर यांनी काम पाहिले. 

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम म्हणाले, प्रथमच या स्पर्धा भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये होत आहेत.  अभ्यासेत्तर हा उपक्रम खास मुलांसाठी आयोजित केला आहे. जेणेकरून ते विविध उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग नोंदवू शकतील.

याच दरम्यान परीक्षकांनी निकाल जाहीर केला. त्यामध्ये 'टीम ए' जिंकली.सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. डॉ.नताशा श्रीवास्तव यांना बेस्ट स्पीकर हा अवॉर्ड देण्यात आला. 

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, डेप्युटी डीन डॉ.नितीन मुदीराज अँनोटोमी विभागाचे सर्व डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी डिबेट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.