BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात जबड्याच्या शस्त्रक्रियेची कार्यशाळा संपन्न


भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात जबड्याच्या शस्त्रक्रियेची कार्यशाळा संपन्न

भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली / रोहित रोकडे 

भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागातर्फे आंतरविद्यापीठ जबड्याच्या शस्त्रक्रिया या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. 

कार्यशाळेचे उद्घाटन भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी केले. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून भारती विद्यापीठ दंत हॉस्पिटल व कॉलेज पुणे येथील डीन डॉ.राजेश क्षीरसागर यांच्यासह दंतचे प्राचार्य डॉ.शरद कामत, ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागप्रमुख डॉ.संजय बायकोडी,  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, जबड्याची शस्त्रक्रिया ही चेहऱ्यातील व दातांमधील विकृती सरळ करण्यासाठी केली जाते. ही सर्जरी ओरल सर्जन व ऑर्थो डेंटिस्ट करतात. यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. 

कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर डॉ.राजेश क्षीरसागर व सहकाऱ्यांनी १९ वर्षाच्या एका मुलीची शस्त्रक्रिया करून तिच्या खालच्या जबड्याची विकृती सरळ केली. याचे आयोजन डॉ.संजय बायकोडी यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी केले होते.

ओरल पॅथोलॉजी विभाग प्रमुख डॉ.दिलीप मगदुम, डॉ.शांडिलय रामानुजन, डॉ.विक्रम सिंग, डॉ.सुधीर पवार उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. जेस्टीना जॉन, डॉ.तेजल पाटील तर आभार डॉ.यशस्वी कानोरिया यांनी मानले.