BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

मुलांसाठी भारती विद्यापीठ मायेचा आधार - डॉ. अस्मिताताई जगताप


मुलांसाठी भारती विद्यापीठ मायेचा आधार  - डॉ. अस्मिताताई जगताप 

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीचा इंडक्शन प्रोग्रॅम 

भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली / रोहित रोकडे 

आपल्या मुलांना जिथे प्रवेश मिळतो तिथे सोडून जायला पालकांना नको वाटतं. धाडस होत नाही. परंतू शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच स्व.डॉ.पतंगराव कदम साहेब यांनी या भारती विद्यापीठाची स्थापना केली.  येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलाला एक प्रेम मिळते, मायेचा आधार मिळतो. म्हणून पालकांनी आपल्या मुलांची अजिबात चिंता करू नये असा विश्वास भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिताताई जगताप यांनी दिला. 


भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीत २०२३-२४ ला प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, स्कूल ऑफ फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ.स्नेहा कटके, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, नर्सिंग प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, डेंटलचे प्राचार्य डॉ.शरद कामत प्रमुख उपस्थित होते.

डॉ.अस्मिताताई जगताप यांनी उपस्थितांना भारती विद्यापीठाविषयी माहिती दिली. स्व.डॉ.पतंगराव कदम साहेब यांनी कशा पद्धतीने विद्यापीठाची उभारणी केली ते सांगितले. आ.डॉ.विश्वजीत कदम यांचेही विद्यापीठात जातीने लक्ष असल्याचे सांगून येथे बरीच संधी मुलांना मिळते.  मुलं काहीतरी वेगळं करु शकतात. भारती विद्यापीठाचा सर्व स्टाफ मदत करणारा आहे. तुम्हाला शैक्षणिक वर्षात काही अडचण आल्यास स्टाफला सांगण्याची विनंती केली.

पाच दिवसीय चाललेल्या या प्रोग्रॅममध्ये भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलची संपूर्ण माहिती देण्यात आली. आयोजित केलेल्या 'रन दे भारती मॅरेथॉन' ची एक झलक स्क्रीनवर दाखवण्यात आली. डॉ.अस्मिताताई जगताप यांनी प्रवेश घेतलेल्या नुतन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचसोबत भावी काळात उत्तम रित्या शिक्षण घेऊन अधिकाधिक विधायक रितीने  रुग्णसेवा करावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या.   

गणेश गीत व भारती विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.दरम्यान चालू शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली त्यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ.नितीन नायक, डॉ.आनंद आनुसे, डॉ.रामचंद्र लिमये, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, आहारतज्ञ धनश्री माळी, फिजिओथेरपी प्राचार्या डॉ.स्नेहा कटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  


भारती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ.नितीन नायक म्हणाले, आयुष्य खुप सुंदर आहे. ते समाधानाने जगता आले पाहिजे. सध्याच्या जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करावे. यावेळी त्यांनी पालकांनाही मार्गदर्शन केले. 

डॉ.आनंद आनुसे यांनी विद्यार्थ्यांना या चार वर्षांत कसा अभ्यास करावा ते सांगून ताण तणावाचे व्यवस्थापन करायचे शिकवले. घरापासून काही मुले लांब असतात. त्याचा ताण येवू नये म्हणून परिस्थिती कशी हाताळायची ते सांगितले. डॉ.रामचंद्र लिमये यांनी विद्यार्थी व स्टाफ यांना मार्गदर्शन केले. मुलांनी कॅम्पसमध्ये कसे वागावे ते समजावून सांगितले.

मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी सायबर क्राईमसंदर्भात माहिती दिली. स्वसंरक्षण कसे करायचे त्याचे धडे दिले. सोशल मिडियाचा प्रभावी वापर करताना फायदा तर आहेच शिवाय त्याचे तोटेदेखील असल्याचे सांगितले. एखाद्याने आपल्यावर हल्ला केला तर त्याचा प्रतिकार कसा करायचा हे स्पष्ट केले. पोलीस क्षेत्रातील माहिती देवून मुलांनी या वयात जबाबदारीने राहण्याचा सल्ला दिला. 

आहारतज्ञ धनश्री माळी यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना पालेभाज्या व फळे खाण्यास सांगून जंक फूड टाळण्याचे आवाहन केले. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटल तसेच भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयातही इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व प्राध्यापक व डॉक्टर यांनी उत्साहात स्वागत केले.

स्कूल ऑफ फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ.स्नेहा कटके यांनी व्यक्तिमत्त्व विकास कसा साधावा हे सांगून संवाद कौशल्ये वाढविण्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांना सांगितली.  डॉ.मनाल अंतिकट यांनीही चालू शैक्षणिक वर्ष व परीक्षेविषयी माहिती दिली. डॉ. अमोघ कुलकर्णी व डॉ. तेजस्वी वरुटे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी डॉ. सुनिल हर्सुलकर, डॉ. ऋतुजा फडके, डॉ. ऐश्वर्या वायदंडे, डॉ. अमृता बजंत्री, डॉ. केविन मकासरे, डॉ. रोहित मसराज, डॉ. प्रज्ञा घाडगे, डॉ. नम्रता गडेकर, डॉ. अरुंधती निंबाळकर, डॉ. अथिरा नायर यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.