भारती हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी सप्ताह साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी सप्ताह साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.सारा धनवडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड, नर्सिंग प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे, डॉ.डी.जी.मोटे, अभिजीत तोडकर, श्वेता कुलकर्णी उपस्थित होते.
'युनाईट टू इग्नाइट अ फायर सेफ इंडिया' या विषयावर आधारित हा सप्ताह राबविण्यात आला. क्वालिटी एश्युरन्स विभागातर्फे आयोजन केले होते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार हेल्थकेअर सुविधांवरील अग्निसुरक्षा या विषयावर दोन दिवसीय पॅन इंडिन वेबिनार मालिका आयोजित केली होती. यामध्ये प्रतिबंधात्मक धोरणे, नियामक अनुपालन, विद्युत अग्निसुरक्षा, अग्निशामक सुरक्षा, अग्निशामक आणि फायर ड्रील या विषयांचा समावेश होता.
यावेळी हॉस्पिटलमध्ये आग नियंत्रण मॉकड्रिल करण्यात आली. हॉस्पिटल फायर व विद्युत परीक्षण केले. पोस्टर स्पर्धा व अग्निसुरक्षा विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
एनएबीएच प्रमुख डॉ.राजश्री वायदंडे, डॉ.महेश पाटील, वरदा सावर्डेकर, फातिमा मोले, यु.व्ही. दिनेशचारी यांच्यासह सुरक्षा अधिकारी अजिंक्य पाटील, आशिष मोहिते, ऋषिकेश शिंदे, बजरंग क्षीरसागर आदी उपस्थित होते.