BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.नितीन मुदीराज

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.नितीन मुदीराज

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.नितीन मुदीराज यांची नियुक्ती करण्यात आली. भारती विद्यापीठाचे कार्यवाह व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी त्यांची नेमणूक केली. वैद्यकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत. शरीरशास्त्रचे (अनोटमी) विभागप्रमुख म्हणूनही ते काम पाहतात. यापूर्वी त्यांनी उपाधिष्ठता (युजी) म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लागण्यासाठी त्यांचा आटोकाट  प्रयत्न असतो.

आ. डॉ. विश्वजीत कदम आणि भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन महाविद्यालय व रुग्णालयाच्या हिताचे  निर्णय घेणार असल्याचे असल्याचे मुदीराज यांनी सांगितले.

यावेळी उपाधिष्ठाता म्हणून डॉ.अजित जोशी (पीजी), उपाधिष्ठाता डॉ. रामचंद्र लिमये (युजी), वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ.सारा धनवडे यांचीही निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे. रुग्णालयात उत्तम प्रकारची सेवा सुविधा उपलब्ध आहेत. तज्ञ डॉक्टर मंडळी आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित असून सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. याचा सर्व रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.