भारती हॉस्पिटलमध्ये हिमोफिलिया संदर्भात डॉक्टरांची कार्यशाळा संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील भारती विद्यापीठ व मेडिकल कॉलेजमध्ये हिमोफिलिया सेल्फ हेल्प ग्रुप सांगली यांच्यावतीने हिमोफिलिया संदर्भात डॉक्टरांची कार्यशाळा संपन्न झाली. सांगली येथील प्रसिद्ध रक्त विकार तज्ञ डॉ. संदीप नेमाणी हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी हिमोफिलिया या आजार व त्यामध्ये नव्याने आलेले औषधे यांची माहिती दिली. हेम लिंपरा या आजारासंदर्भात आधुनिक उपचार पद्धती व शासनाच्या योजनेत उपचार याविषयी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.
या कार्यशाळेस भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदिराज, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुहास कुंभार, आयएमपीएचे अध्यक्ष डॉ. मुनवर मुजावर,
मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. चिदानंद चिवटे, डॉ. पंकज पलंगे, डॉ. जयश्री आवळेकर, ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत देशपांडे, प्रा. प्राजक्ता भिडे यांच्यासह भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यात भारती हॉस्पिटलमध्ये हिमोफिलिया डे-केअर सुरू करण्याची घोषणा डॉ. सारा धनवडे यांनी केली.
स्वागत डॉ. सारा धनवडे यांनी केले. हिमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी उपाध्यक्ष रामू गडकर यांनी आभार मानले. यावेळी सांगली सेल्फ हेल्प ग्रुपचे उज्वला निरवाणे, विजयकुमार निरवाणे, सांगली शहर व परिसरातील रुग्ण त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

