BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये हॉस्पिटल कम्युनिकेशनवर सीपीडी कार्यक्रम संपन्न

 


भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये हॉस्पिटल कम्युनिकेशनवर सीपीडी कार्यक्रम संपन्न 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये नोंदणीकृत परिचारिकांसाठी निरंतर व्यावसायिक विकास (सीपीडी) कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेल्या या कार्यक्रमासाठी १० क्रेडिट पॉइंट्ससाठी होते. हॉस्पिटल कम्युनिकेशन: 'दर्जेदार रुग्णसेवेसाठी व्यावसायिक संवाद मजबूत करणे' या महत्त्वपूर्ण विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधील पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ.संजय कुरैशी, मानसोपचार विभागप्रमुख डॉ. नितीन पी. पाटील तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे निरीक्षक बबन वाय. खांडेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी केले. यावेळी भारती हॉस्पिटलमधील नर्सिंग सुपरिंटेंडेंट श्रीमती सरस्वती हेरवाडे यांनी मार्गदर्शन केले.



या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विविध आरोग्यसेवा क्षेत्रांमध्ये कार्यरत परिचारिकांच्या संवाद कौशल्यांचा विकास करणे हा होता. रुग्णसेवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी परिचारिका-रुग्ण संवाद, आंतर-व्यावसायिक सहकार्य तसेच संस्थात्मक संवाद अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान अनुभवी प्राध्यापकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

यात परिचारिका-रुग्ण संवाद या विषयावर -डॉ. बाहुबली गेद्दुगोळ, परिचारिका-आरोग्यसेवा व्यावसायिक संवाद या विषयावर प्रा. विशाल घोरपडे, रुग्णालयातील क्षैतिज संवाद या विषयावर- श्रीमती स्नेहलता एस. रेड्डी, अनुलंब संवाद (ऊर्ध्वगामी) या विषयावर श्रीमती सुदैवी कदम, तर अनुलंब संवाद (अधोगामी) या विषयावर श्रीमती निर्मला आशिष लोंढे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता सहाय्यक प्राध्यापक सतीश एन. साळवी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी सर्व मान्यवर, वक्ते आणि सहभागींचे योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

एकूणच, हा सीपीडी कार्यक्रम अत्यंत यशस्वी, माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरला. सुरक्षित, कार्यक्षम व रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवा देण्यासाठी प्रभावी संवादाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.