BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यावर भर दिला पाहिजे - प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे


विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यावर भर दिला पाहिजे - प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे 

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाच्या एनएसएस शिबीराचे उद्घाटन 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

व्यक्ती नव्हे तर समाज महत्त्वाचा मानून विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यावर भर दिला पाहिजे असे मत भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी व्यक्त केले.येळावी ता. तासगाव येथील तुरची फाट्यावर विशेष एनएसएस हिवाळी शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून पलूस पंचायत समितीचे सभापती जगन्नाथ मोटे आणि ग्रामपंचायत सावंतपूरचे उपसरपंच डॉ. मंगेश मोटे होते.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त एनएसएसच्या सुमारे ५० स्वयंसेवकांनी याचे आयोजन केले. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात क्षयरोग आणि त्याच्या प्रतिबंधाविषयी जनजागृती करणाऱ्या आकर्षक पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. त्यातून ग्रामस्थांना संदेशही देण्यात आला. आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. झाडे लावण्यात आली. स्वच्छता मोहीम करण्यावर अधिक भर देण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या शिबिरामुळे सार्वजनिक आरोग्य उपक्रमांत जागरूकता वाढते. सामुदायिक सहभागास प्रोत्साहन मिळते. त्यातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते. त्यांना सामाजिक जागृती येते.

स्वागत प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी केले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. तेजस्विनी चौगुले आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित कांबळे यांच्या देखरेखीखाली पार पडला.

डॉ. विजया कुंभार, डॉ. अपर्णा काळे, डॉ. बाहुबली गेद्दुगोळ, डॉ. बसवंत धुडुम यांच्यासह प्रा. सतीश साळवी, प्रा. निर्मला लोंढे, प्रा. सचिन सकटे आणि प्रा. शार्दुल जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.