भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात सीपीडी कार्यक्रम
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात ७ एप्रिल २०२६ रोजी Think Smart, Act Scientific: Evidence-Based Practice (EBP) for Nurses या विषयावर सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता असून १० क्रेडिट गुण देण्यात आले.
यानंतर डॉ. धनराज बाबू यांनी कार्यक्रमाचा विषय स्पष्ट करताना नर्सिंग क्षेत्रात पुराव्यावर आधारित पद्धतींचे (EBP) महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुणे व एमएनसी निरीक्षक यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना नर्सेससाठी सतत शिक्षण व कौशल्यवृद्धीचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात डॉ. बसवंत धुडूम, सौ. स्वाती कुराणे, श्री. सचिन सकटे, डॉ. अपर्णा काळे व श्री. सॅमसन कांबळे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी क्लिनिकल प्रश्न तयार करणे, संशोधनाचा वापर, अडचणींवर मात करणे आणि प्रत्यक्ष कामात EBP चा वापर याबाबत माहिती दिली.
विद्यार्थी स्नेहल धनावडे यांनी आभार मानले. हा CPD कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरला. नर्सिंग व्यावसायिकांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यास मदत झाली.

.jpeg)
