भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), पुणे अंतर्गत कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष) उपक्रमांतर्गत 'जैव-सांख्यिकीतील प्रात्यक्षिके: नमुना निवड, प्रमाणीकरण व संदर्भ लेखन' या विषयावर दि. १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
पहिल्या दिवशी प्रख्यात सांख्यिकी तज्ज्ञ डॉ. सतीश व्ही. काकडे, सांख्यिकी तज्ज्ञ तथा सहयोगी प्राध्यापक, सामुदायिक वैद्यक विभाग, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (अभिमत विद्यापीठ), कराड यांनी नमुना निवड, नमुना आकार निर्धारण, विश्वसनीयता व प्रमाणीकरण यावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी अंतर्गत प्राध्यापकांकडून संदर्भ लेखन पद्धती व मेंडेले सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण दिले.
प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन पदव्युत्तर समन्वयक डॉ. बाहुबली जे. जी. व पदवी समन्वयक सौ. अक्कमहादेवी बी. यांनी केले. त्यांच्या विभागातील प्राध्यापकांनीही आयोजनास सहकार्य केले.
या कार्यशाळेत पहिल्या दिवशी प्रथम वर्ष एम.एस्सी. नर्सिंगचे २५ विद्यार्थी व २५ अध्यापक सहभागी झाले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सुरेश रे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीमती अर्चना धनवडे यांनी प्रमुख पाहुण्यांच्यी ओळख करून दिली. विद्यार्थीनी प्रीती थोरात यांनी सूत्रसंचनालन केले. प्रा. स्वाती कुरणे यांनी आभार मानले.

.jpeg)