रुग्णांची उत्तम सेवा केल्यास भविष्य उज्ज्वल - डॉ. श्रीलेखा राजेश | भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात २० वा दीप प्रज्वलन समारंभ
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
नर्सिंगमध्ये चांगल्या संधी आहेत. रुग्णांची तुम्ही उत्तम सेवा केल्यास भविष्य तुमचे उज्ज्वल होईल असा विश्वास डॉ. श्रीलेखा राजेश यांनी व्यक्त केला. येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयातील २० व्या दीप प्रज्वलन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाची मी माजी विद्यार्थी असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंग पुणेचे डायरेक्टर प्रा.डॉ. सोनोपंत जोशी होते. प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी स्वागत केले.
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे, शैक्षणिक संचालक डॉ. आर.बी.कुलकर्णी, ऑप्टोमेट्री कॉलेज प्रमुख शिवानंद हदीमनी, डॉ. आशुतोष श्रीवास्तव, सरस्वती हेरवाडे, वरदा सावर्डेकर, श्वेता कुलकर्णी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व नर्सिंग महाविद्यालयाच्या न्यूज लेटरचे प्रकाशन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांना २०२५ चा महाराष्ट्र शासनाचा जे.पी. नाईक आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी नर्सिंग विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे सेवा करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांसोबत काम करणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सोनोपंत जोशी म्हणाले,भारती विद्यापीठ ही माझी मातृसंस्था आहे. एमएस्सी नर्सिंग मी भारती विद्यापीठातच केले आहे. सुंदर अशा कॅम्पसमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी आल्याचा मला आनंद आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. निलिमा सोनवणे यांनी नर्सिंग क्षेत्रात जगात विद्यार्थ्यांना भरपूर मागणी आहे त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी असल्याचे ऑनलाइन माध्यमातून सांगितले.
सूत्रसंचालन प्रा. निखिल जाधव तर आभार प्रा. सीमा गेद्दुगोळ यांनी मानले. सर्व विद्यार्थी, पालक प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

