भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये नर्सिंग एज्युकेशन कार्यशाळा उत्साहात संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), कॉलेज ऑफ नर्सिंग सांगली येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) उपक्रमांतर्गत दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी “Blueprint to Practice: Designing, Teaching and Evaluating Nursing Curricula” या विषयावर नर्सिंग एज्युकेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत श्रीमती संगीता ओक, सहाय्यक शिक्षिका, अल्फोन्सा स्कूल, मिरज, डॉ. धनराज बाबू आणि श्रीमती शैला मॅथ्यू यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत नर्सिंग अभ्यासक्रमाचे नियोजन व रचना, सातत्यपूर्ण आणि अंतिम मूल्यमापन, मास्टर रोटेशन प्लॅन, क्लिनिकल रोटेशन प्लॅन, परीक्षा आराखडा, अभ्यासक्रम व घटक नियोजन तसेच प्रश्नपत्रिकेचा अवघडपणा निर्देशांक या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेचे आयोजन भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगलीचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच सचिव श्रीमती स्नेहलता रेड्डी आणि आयोजन समितीच्या सदस्य श्रीमती तेजस्विनी चौगुले, श्रीमती स्वाती कुरणे यांनी कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या कार्यशाळेमुळे नर्सिंग शिक्षकांना अभ्यासक्रमाचे प्रभावी नियोजन, आधुनिक अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रियेतील विविध पैलू समजून घेण्यास मदत झाली. तसेच नर्सिंग शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.

